गुन्हेजळगाव जिल्हाबातम्या

Jalgaon : आगीच्या घटनेनं धावत्या गाडीतून उड्या मारल्या, पण दुसऱ्या एक्स्प्रेसने अनेकांना चिरडले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२५ । पाचोरा (Pachora) नजीक असलेल्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ आज २२ जानेवारीला सायंकाळीच्या सुमारास एक भीषण रेल्वे दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पुष्पक एक्सप्रेसमधील (Pushpak Express) प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावत्या गाडीतून उड्या मारल्या. त्यातचवेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसनं (KARNATAKA EXPRESS) पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना चिरडल्याची घटना घडली आहे. यात अनेक जण जखमी झाले असून, काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. जखमींना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?
जळगावच्या परधाडे गावाजवळ हा अपघात घडला. पुष्पक एक्स्प्रेस ही लखनऊकडून मुंबईकडे येत होती. एक्स्प्रेसच्या लोकोपायलटनं अचानक ब्रेक दाबले. त्यामुळं ठिणग्या उडाल्या. आग लागल्याच्या भीतीनं पुष्पक एक्स्प्रेसमधून ३५ ते ४० प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. त्याचवेळी बाजूच्या रुळांवरून बेंगळुरू नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस जात होती. त्या कर्नाटक एक्स्प्रेसने यातील काही प्रवाशांना उडवलं.

या दुर्घटनेत सात ते आठ जणांचा मृत्यू आल्याची माहिती आहे. मात्र मृतांचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाहीये. दरम्यान, अपघातातील जखमींना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान काही तासानंतर पुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे तर कर्नाटक एक्स्प्रेस नवी दिल्लीकडे रवाना करण्यात आली आहे. याबाबत माहिती मिळताच जिल्हा प्रशासनातील अधिकारी व रेल्वेच अधिकारी, कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट द्वारे या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले.

घटनास्थळी आता मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पोलीस अधीक्षक पोहोचले असून घटनेची माहिती घेतली जात आहे .

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button