---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

टाकरखेडा शिवारात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा ; लाखोंच्या मुद्देमालांसह ९ जणांना अटक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा शिवारात सुरू असलेल्या पत्ता जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी जुगार खेळताना ९ जणांना अटक असून मोटारसायकली, रिक्षासह एकूण ३ लाख ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jugar

अमळनेर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, समाधान पाटील यांच्या शेतात झन्ना मन्ना नावाचा पत्ता जुगार खेळला जात आहे. त्यानुसार अमळनेर पोलिसांनी कारवाई करून जुगार खेळणाऱ्या व खेळवणाऱ्या ९ जणांना या छाप्यात पकडले.

---Advertisement---

या छाप्यात पोलिसांनी १ लाख २६ हजार ९६० रुपये रोख रक्कम, ५ मोटारसायकली, १ रिक्षा आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment