Jalgaon : जुगार अड्ड्यावर धाड, लाखो रुपयांच्या रोकडसह तिघे पोलिसांच्या ताब्यात

जुलै 25, 2025 4:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२५ । जळगाव तालुका हद्दीतील आव्हाणा शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत २ लाख १४ हजार ५० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून तीन जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jugar

जितेंद्र रामचंद कदम (रा. हरिकृष्ण नगर), संजय जनार्दन सपकाळे (५०, रा. शिवाजीनगर) आणि मयूर कैलास भावसार (३२, रा. इंद्रप्रस्थ नगर) असं गुन्हा दाखल केलेल्या तिघांचे नाव आहे.

जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या आव्हाणा शिवारातील प्लॉट नं. 3, हरीकृष्ण नगर, गट नं. 633, कानळदा रोड येथे जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला.

या छाप्यात, घटनास्थळी ‘तीन पत्ती’ नावाचा जुगार सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्वरित कारवाई करत जुगार खेळणाऱ्या जितेंद्र कदम, संजय सपकाळे आणि मयूर भावसार यांना रंगेहात पकडले. जुगार अड्ड्यावरून रोख ₹2,14,050 आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचे दिसून आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now