जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२१ । एरंडोल येथील साईं गजानंद मंदिर जवळ वखार जागांवर जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकत दुचाकीसह रोकड जप्त करून सात जणांवर कारवाई केली आहे.

कोरोनाची साथ सुरू असल्याने कलम १४४ प्रमाणे संचारबंदी लागू आहे. पाच पेक्षा जास्त लोकांनी गर्दी करू नये असे निर्देशन शासनाने दिले आहे. अशात एरंडोल येथे जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलीस पथकाने त्या जुगार अड्डावर छापा मारला. त्यात 20,000 रुपये किंमतीचे मोटारसायकली व 31070 रुपये रोख असे एकूण 51070 किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. एकूण सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
यात आकाश सुरेश चौधरी (वय -30, रा. चौधरी गल्ली एरंडोल), चंद्रकांत नारायण महाजन (वय -31, रा . माळी वाडा , एरंडोल), नारायण शिवाजी पाटील (वय -35 रा.सावता माळी), दिपक तुकाराम पाटील (वय -40 रा.माळी वाडा एरंडोल), पवन रमेश शर्मा (वय- 40 रा.मारवाडी गल्ली, एरंडोल), शरद जयराम पगारे वय -39 रा.पद्मालय नगर एरंडोल), शरद सुकलाल महाजन (वय -38 रा.सावतामाळी नगर) यांच्पोयावरलिस स्टेशनला भादंवी कलम १८८, २६९, पो. अधि. कलम नुसार अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल भगवान तुकाराम पाटील यांच्या खबरीवरून गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे हे करित आहे.