---Advertisement---
गुन्हे धरणगाव

धरणगावच्या जिनिंगमध्ये छापा; पंचनामा करण्यास महसूल नकार, गोदाम सील

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । धरणगाव शहरातील कमल जिनिंगमध्ये धान्याचा अवैध साठा करून ठेवल्याची माहिती मिळताच विशेष पोलिस महानिरीक्षकांनी स्थापन केलेल्या पोलिसांच्या विशेष पथकाने त्या जिनिंगमध्ये छापा टाकला. मात्र, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐनवेळी पंचनामा करायला नकार दिल्यामुळे गोदामाला सील केले आहे.

raid jpg webp

याबाबत असे की, धरणगाव शहरातील कमल जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात धान्य असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार चार जणांच्या पथकाने गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास कमल जिनिंगमध्ये छापा टाकला. त्या ठिकाणी गहू आणि तांदळाची पोती आढळून आली. ते धान्य रेशनचे आहे की खासगी आणि रेशनचे असेल तर नियमाप्रमाणे साठा आहे की नाही हे ठरविण्यासाठी पोलिसांच्या पथकाने याबाबत महसूलच्या अधिकाऱ्यांना माहिती देत त्यांना पंचनामा करण्यासाठी बोलावले. त्यामुळे धरणगाव तहसील कार्यालयातून एक अधिकारी घटनास्थळी आले.

---Advertisement---

परंतु महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐनवेळी पंचनामा करायला नकार दिला. पोलिस कारवाईबाबत कोणतीही पूर्वसूचना नसल्यामुळे पंचनामा करण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे कार्यवाही पूर्ण झाली नाही. महसूलचे अधिकारी पंचनामा करीत नाहीत हे लक्षात आल्यावर पोलिसांनी जिनींगला सिल केले आहे. आज शुक्रवारी कार्यवाही पूर्ण हाेईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---