जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील शरीरशास्त्र विभागातर्फे आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. केतकी पाटील सभागृहात आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अमृत महाजन, प्रा. डॉ. शुभांगी घुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि धन्वंतरी पूजनाने करण्यात आले. शरीरशास्त्र विभागाशी संबंधित आयोजित या प्रश्नमंजुषा स्पर्धेत तीन टिम सहभागी झाल्या होत्या.
यात भावेश जाधव आणि निर्झरा टाटीया ग्रे टीम, पुष्पक गभाने आणि पल्लवी मोरे यांची बीडीसी टीम, देवर्षी शर्मा आणि प्रतिमा अंबेश यांची एएम टीम यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत एएम टीम ही विजेता ठरली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले.