जळगाव शहर

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञान वाढून स्पर्धा परिक्षांचे महत्व अधोरेखित व्हावे या उद्देशाने येथील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात ‘सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ९५ विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राथमिक फेरी लेखी स्वरुपात घेण्यात आली. त्यापैकी अंतिम फेरीसाठी १५ विद्यार्थ्यांचे पाच गट करण्यात आले. या गटांसाठी भाषा-साहित्य, सामाजिक शास्त्रे, सामान्य विज्ञान, क्रीडा सोबत दृकश्राव्य फेरी अशा पाच फेऱ्या घेण्यात आल्या.

स्पर्धेचे उद्घाटन प्रा. एस.ओ.उभाळे, उपप्राचार्य प्रा. के.जी. सपकाळे, प्रा. स्वाती बऱ्हाटे, प्रा. प्रसाद देसाई, प्रा. उमेश पाटील आदी मान्यवर उपस्थितीत पार पडले. स्पर्धेत प्रथम क्रमांक मोहित संजय सोनी, हितेश किशोर सोनार, हेमंत श्रावण जोधा तर द्वितिय क्रमांक दुर्गेश अनिल पाटील, श्रावणी निलेश पाठक, रितेश राजेश पाटील आणि तृतीय क्रमांक मयुरेश पाटील, पियुष दशरथ सोनवणे, सौम्या संजयकुमार हिरानी हे तीन गट पुरस्काराचे मानकरी ठरले. स्पर्धेसाठी प्रा. लीना भारंबे, प्रा. शिल्पा सरोदे, प्रा. उमेश पाटील यांनी परिक्षण केले. प्रा.देवेंद्र गुरव यांनी ध्वनीव्यवस्था सांभाळली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ईशा वडोदकर, प्रा. दिपक चौधरी यांनी केले. कार्यक्रम संयोजक म्हणून डॉ. श्रध्दा जोशी यांनी तर प्रा.गणेश सूर्यवंशी, प्रा. दिनेश महाजन, प्रा.दारासिंग पावरा, प्रा.प्रमिला सोनवणे, जयेश शिंपी यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. स्पर्धा यशस्वीतेसाठी विजय जावळे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Related Articles

Back to top button