⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | नोकरी संधी | पंजाब नॅशनल बँकेत 12 वी पास उमेदवारांसाठी संधी; किती पगार मिळेल?

पंजाब नॅशनल बँकेत 12 वी पास उमेदवारांसाठी संधी; किती पगार मिळेल?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक आनंददायक बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) अलिकडे कस्टमर सर्व्हिस असिस्टंट आणि ऑफिस असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.  Punjab National Bank Recruitment 2025

ही भरती स्पोर्ट्स कोटाअंतर्गत होणार आहे, ज्यामध्ये उमेदवारांची निवड त्यांच्या खेळाच्या कामगिरी आणि फील्ड ट्रायल्सवर आधारित केली जाईल.पंजाब नॅशनल बँकेच्या या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025 आहे. या भरती मोहिमेत एकूण 9 रिक्त पदे भरली जाणार आहेत. Punjab National Bank Bharti 2025

काय आहे पात्रता?
कस्टमर सर्व्हिस असोसिएट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे, तर ऑफिस असिस्टंट पदासाठी उमेदवार 12 वी पास असणे गरजेचे आहे. कस्टमर सर्व्हिस असोसिएट पदासाठी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे असावे, तर ऑफिस असिस्टंट पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्षे असावे.

किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन मिळेल. कस्टमर सर्व्हिस असोसिएट पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 24,050 ते 64,480 रुपये पगार मिळणार आहे, तर ऑफिस असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 19,500 ते 37,815 रुपये पगार मिळणार आहे.

इथे पाठवावा लागेल अर्ज?
उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरून अर्ज फॉर्म डाउनलोड करावा लागेल, त्यानंतर फॉर्म भरून कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याचे पत्ते म्हणजे चीफ मॅनेजर, मानव संसाधन प्रभाग, पंजाब नॅशनल बँक, कॉर्पोरेट कार्यालय, पहिला मजला, पश्चिम विंग, प्लॉट नंबर 4, सेक्टर 10, द्वारका, नवी दिल्ली 110075.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.