---Advertisement---
जळगाव जिल्हा

पुणे-शेगाव दरम्यान लवकरच वंदे भारत ट्रेन्स धावणार; जळगाव, भुसावळ स्थानकांवर मिळणार थांबा?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । भारतीय रेल्वेने (Indian Railway) कात टाकत सेमीहायस्पीड असलेली वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) आणली असून ती देशातील विविध भागात धावतही आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला देशभरात चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र देशातील महत्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेलं भुसावळ (Bhusawal). या मार्गे अद्यापही एकही वंदे भारत एक्स्प्रेस धावत नाहीय. यामुळे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील प्रवाशांना या गाडीची प्रतीक्षा आहेत. मात्र आता त्यांची प्रतीक्षा संपुष्टात येऊ शकते

vande bharat train

खरंतर या वर्षात पुण्यातून धावणार्‍या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन्सची संख्या वाढणार आहे. ताज्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने पुण्याहून आणखी ४ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पुणे-शेगाव (Pune Shegaon), पुणे-वडोदरा, पुणे-सिकंदराबाद आणि पुणे-बेळगाव या मार्गांवर धावतील. या वंदे भारत एक्स्प्रेस नेमक्या कधीपासून सुरू करण्यात येणार याच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आल्या नाही.

---Advertisement---

दरम्यान, पुण्यातून धावणाऱ्या चार नवीन वंदे भारत एक्स्प्रेस पैकी एक पुणे शेगाव ही ट्रेन भुसावळ मार्गे धावू शकते.रेल्वे मंत्रालयाने देशातील लोकप्रिय तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार अनेक ठिकाणीही या गाड्या धावत आहे. त्यानुसार आता पुणे – शेगाव वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच धावणार आहे. यामुळे वंदे भारत ट्रेनच्या प्रतीक्षेत असलेल्या भुसावळकरांना ही खुशखबर ठरू शकते. दरम्यान, मध्य रेल्वेमार्गावर जळगाव व भुसावळ ही महत्त्वाची जंक्शन स्थानके आहेत. या स्थानकांवरुन शेगावी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ‘वंद भारत ट्रेन’ला या दोन्ही स्थानकांवर थांबा मिळण्याचीही शक्यता आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---