---Advertisement---
हवामान

जळगावसह राज्यातील ‘या’ भागात पावसाचं कमबॅक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२१ । मागील गेल्या काही दिवसाभरापासून  दडी मारलेल्या पावसाने राज्यातील काही भागात पुन्हा कमबॅक केलं आहे. पुण्यासह सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी आज सकाळपासून पावसानं हजेरी लावलीय असल्याची माहिती हवामान विभागानं दिलीय. दरम्यान, आज दुपारी २.५० वाजेच्या सुमारास जळगाव शहरासह परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहे. जोरदार वार्यासह सरी कोसळत होते.

rain 1 jpg webp

पुणे शहरातील विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात गेल्या चार दिवसांमध्ये पावसानं विश्नांती घेतली होती. मात्र, आज हलक्या पावसाला सुरुवात झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सातारा जिल्ह्यातही पावासानं कमबॅक केलं आहे. आज सकाळपासून पाऊस सुरु झाला आहे. सातारा शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाला सुरुवात झाली आहे. साताऱ्यात आज सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं. गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं छत्री न घेता बाहेर पडलेल्या सातारकरांची पावसामुळं धांदल उडालेली पाहायला मिळाली.

---Advertisement---

भारतीय हवामान विभागाचे जेष्ठ अधिकारी के. ए. एस होसाळीकर यांनी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील, अस अंदाज असल्याची माहिती दिली आहे. पुढील तीन तासात मुंबईसह रायगड जिल्ह्यात पाऊस होईल, अशी माहिती देण्यात आलीय.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरी देखील जिल्ह्यात अद्यापही मुसळधार पावसाने हजेरी लावली नाहीय. त्यामुळे पिकांनी मान टाकली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

अधून मधून ढग येताय, त्यामुळे शहरासह परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले. परंतु पाऊस काही कोसळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी चिंतेत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---