जळगाव लाईव्ह न्यूज ।१ एप्रिल २०२२। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेंतर्गत असलेल्या बोध्द अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने ‘बौध्द तत्वज्ञान आणि भारतीय उच्च शिक्षणप्रणाली’ या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले.
बौध्द तत्वज्ञानाच्या अधिष्ठानावर आधारित अभ्यासपूर्ण ग्रंथ निर्मिती करण्याच्या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्राध्यापक आणि शिक्षक अभ्यासक तज्ज्ञ आणि संशोधक विद्यार्थ्यांकडून शोधनिबंध वा लेख मागविण्यात आले होते. त्यातूनच ‘बौध्द तत्वज्ञान आणि भारतीय उच्च शिक्षणप्रणाली’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. या पुस्तकात एकूण २९ लेखाचा समावेश आहे. या पुस्तकाचे संपादन प्रशाळेचे संचालक प्रा.अनिल डोंगरे व विभाग प्रमुख डॉ.संतोष खिराडे यांनी केले आहे. मंगेश दहिवले यांची प्रस्तावना असून जळगावच्या प्रशांत पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. यावेळी डॉ.अनिल डोंगरे, डॉ. संतोष खिराडे, रंगराव पाटील, प्रदीप पाटील, प्रा.जगतराव धनगर आदी उपस्थित होते.