⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सरकारी योजना | रोज 416 रुपयांची बचत करा, काही वर्षातच करोडपती व्हाल ; जाणून घ्या सरकारच्या ‘या’ योजनेबद्दल..

रोज 416 रुपयांची बचत करा, काही वर्षातच करोडपती व्हाल ; जाणून घ्या सरकारच्या ‘या’ योजनेबद्दल..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२४ । प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या अशा योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यात तुम्ही काही वर्षातच करोडपती होऊ शकतात.

होय हे खरं आहे. सरकारची पब्लिक प्रोविडंट फंड (PPF Scheme) ही योजना खप फायदेशीर आहे. या योजनेत ग्राहकांना चांगले व्याजदर मिळते. या योजनेत तुम्ही रोज ४१६ रुपये जमा करुन काही वर्षात करोडपती होऊ शकतात. यात गुंतवणूकदारांना ७.१ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत तुम्ही कमीत कमी ५०० रुपयांची गुंतवणूक करु शकतात. तर जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात.

या योजनेचा मॅच्युरिटीचा कालावधी १५ वर्षांचा आहे. यामध्ये ५-५ वर्षांचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. या योजनेत तुम्ही मॅच्युरिटीच्या कालावधीनंतर करोडपती होऊ शकतात.या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही रोज ४१६ रुपयांची बचत करा. त्यामुळे प्रत्येक महिन्याला १२,५०० रुपये जमा होतील. वर्षाला १.५ लाख रुपये जमा होतील.

जर तुम्ही या योजनेत २५ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्ही १ कोटी रुपयापेक्षा जास्त रुपये मिळतील. या योजनेत ७.१ टक्के व्याजद लागू होते. त्यानुसार २५ वर्षानंतर तुम्हाला १,०३,०८,०१५ रुपये मिळतील. पीपीएफ योजनेत तुम्हाला गुंतवणूकीवर अनेक फायदे मिळतात.या योजनेवर 80C कलमाअंतर्गत कर लागू हत नाही.त्यामुळे मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम ही करमुक्त असेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.