⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 5, 2024
Home | जळगाव जिल्हा | एकदम भारी : राज्यात जळगावच्या एस.टीची छप्परफाड कमाई !

एकदम भारी : राज्यात जळगावच्या एस.टीची छप्परफाड कमाई !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२३ । जळगावची लालपरी संपुर्ण राज्यात पहिली आली आहे. राज्य परिवाहन महामंडळाच्या माध्यमातून राज्यात सर्वाधीक उत्पन्न मिळवून दिल्याबद्दल जळगावचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सत्कार करणण्यात आला.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थीत होते. आमदार भरत गोगावले, ‘एसटी’चे सदिच्छादूत तथा अभिनेते मकरंद अनासपुरे, परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, ‘एसटी’चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार हे देखील या ठीकाणी उपस्थित होते.

या वेळी उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या राज्यातील तीन विभागांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये जळगाव, जालना व भंडारा विभागांचा समावेश आहे. जळगाव विभागाने सर्वाधीक किलोमीटरच्या प्रवासासह सर्वाधीक उत्पन्न मिळवल्याचा बहुमान प्राप्त केला आहे. या अनुषंगाने जळगाव विभागाचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह