⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 27, 2024
Home | जळगाव जिल्हा | ईपीएस-९५ पेन्शनर यांचा जळगाव इपीएफओ कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन

ईपीएस-९५ पेन्शनर यांचा जळगाव इपीएफओ कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । २७ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व इपीएस ९५ पेन्शनर यांनी जळगाव येथील इपीएफओ (कर्मचारी भविष्य निधी संघटन) कार्यालय येथे सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन केले. राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत व त्यांची टीम जेष्ठ व वृध्द पेन्शनर यांचे साठी अखंड व अविश्रांत परिश्रम घेत आहे. त्यांच्या आदेशानुसार आज सहआयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यातील पावसाळी वातावरण ,व आपल्या तब्बेत याची काळजी न करता कार्यक्रमास हजेरी लावली. सदर प्रसंगी भुसावळ येथील मीठाराम सरोदे,जामनेर येथील हरी व्यवहारे ,जळगांव येथील अरविंद भारंबे,डी. एन. पाटील, संजीव खडसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सदर प्रसंगी ाळवल जळगांव येथील रेमंड,सुप्रीम,तसेच भुसावळ येथील खडकां सूत गिरणी येथील माता,भगिनी, पेन्शनर पी. एच पाटील साहेब. फैजपूर येथील सुरेश महाजन,भुसावळ येथील एस टी व वीज कंपनी तील कर्मचारी,पाचोरा,म्हसवद जामनेर येथील संतोष पाटील, सपकाळे, जेडीसीसी बँकेतील निवृत्त कर्मचारी.रावेर येथील एस टी कर्मचारी. पारोळा ,भडगाव व खास करून यावल येथील अनेक सेवानिवृत्त मंडळी यांनी हजेरी लावली.

आणी अनेक जळगांव शहरातील विविध क्षेत्रातील इपीएस ९५ पेन्शनर यांनी हजेरी लावली. असे एकूण इपीएस ९५ पेन्शनर ज्यांनी स्वाक्षर्या केल्या बद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार सदर कार्यक्रमासाठी जळगांव जिल्हा राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद भारंबे ,उपाध्यक्ष रमेश नेमाडे ,सचिव डी. एन पाटील कार्याध्यक्ष संजीव खडसे ,कौतिक किरन्गे ,भीरुड साहेब यांनी परिश्रम घेतले. शेवटी दि. एक ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई ,आझाद मैदान येथील भव्य सभेसाठी हजर राहण्याचे आवाहन करून कार्यक्रम संपन्न झाला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.