⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | बोदवडमध्ये हायहोल्टेज ड्रामा; रात्री दोन वाजता कार्यकर्त्यांसह उमेदवाराचे पोलीस ठाण्यात अनोखे आंदोलन

बोदवडमध्ये हायहोल्टेज ड्रामा; रात्री दोन वाजता कार्यकर्त्यांसह उमेदवाराचे पोलीस ठाण्यात अनोखे आंदोलन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२४ । एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात प्रचार सभांमध्ये राजकीय नेते एकमेकांवर शा‍ब्दिक हल्लेच चढवत असून तर काही ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. आता यातच बोदवड पोलीस ठाण्यात हायहोल्टेज ड्रामा दिसला.

उमेदवाराने ठिय्या आंदोलन करत रात्री दोन वाजता पोलीस ठाण्यातच पंगत बसवली. याठिकाणी रात्री कार्यकर्त्यांसह खिचडी खाल्ली. पोलीस कारवाई करत नसल्याने असे अनोखे आंदोलन करण्यात आले. त्याची आता राज्यभर चर्चा रंगली आहे.

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. याच दरम्यान प्रचार रॅलीत गोंधळ होऊन कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप रोहिणी खडसे केला आहे. पोलीस कारवाई करत नसल्याने त्यांनी रात्री दोन वाजेपर्यंत बोदवड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.

जलचक्र तांडा येथे हा प्रकार घडला. मारहाणी झाले ते कार्यकर्ते आता बोदवड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला आले आहेत. मी माझ्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आमची इतकीच आपेक्षा आहे की ज्यांना मारहाण झाली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.