मुक्ताईनगर विधासभा क्षेत्रतील २२६२ घरांच्या पुनर्वसनासाठी रु.३८०.७५ कोटीचा प्रस्ताव
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२४ । जळगाव जिल्ह्यातील हतनूर पाटबंधारे प्रकल्पासाठी विशिष्ट तलांकापर्यंत भुसंपादन होणे, पूर्ण पातळीपर्यंत पूर आल्यावर संपादीत जमिनीच्या वरील तलांकावरील जमिनी पाण्याखाली जाणे, त्या जमिनीवरील पिकांचे वारंवार नुकसान होणे, अशा नुकसानग्रस्त जमिनीसाठी भरपाई देणे, अशा जमिनी संपादनासाठी शासनाने दिनांक २१ सप्टेंबर २०१२ मध्ये स्तुत्य शासनिर्णय घेऊन कार्यवाही करण्याबाबत आदेश देणे, सन २०२२ मध्ये आयआयटी मुंबईकडून याबाबत झालेला अभ्यास, सदर अहवाल स्विकारून ऐनपूर, निंबोल ता.रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील शेतजमिनी व निवासी घारे संपादन करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना. अश्या आशयाची महत्तवपूर्ण लक्ष वेधी आ.एकनाथराव खडसे यांनी अधिवेशनात उपस्थित केली होती.
त्यावर उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले उत्तर खालील प्रमाणे :- सदर प्रकल्पासाठी मौजे–विटवे, ऐनपूर ता.रावेर येथील काही जमिनी संपादीत करण्यात आलेल्या आहे. तथापि हतनूर जलाशयातील लगतच्या रावेर तालुक्यातील मौजे – विटवे, निंभोरासिम, निंबोल तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील नांदूपिंप्री, अंतुर्ली, धामंदे, बेलसवाडी इ. ठिकाणी पूर परिस्थिती दरम्यान जमिनी वारंवार पाण्याखाली जात असल्याचे नमूद करून नुकसान भरपाई व घरे संपादन करणेबाबताची मागणी गावातील जमीन मालकांनी केली आहे.
जलसंपदा विभाग शासन निर्णय दिनांक २९/०९/२०१२ च्या अनुषंगाने हतनूर जलाशयाच्या लगतच्या पूर परिस्थिती दरम्यान वारंवार पाण्याखाली जाणाऱ्या रावेर तालुक्यातील मौजे विटवा, ऐनपूर व निंबोल या गावातील ५५.४३ हे जमिनीचे संपादन करण्यात आलेले आहे.
या उपरांतही दरम्यानच्या कालावधीत हतनूर जलाशयातील आजूबाजूच्या ११ गावातील घरांमध्ये ओल येणे, साप, विंचू यांचा वावर असणे दरडीवर घरे असणे, सारांशाने अप्रत्यक्षरीत्या बाधित होणाऱ्या गावांचा प्रस्ताव बाधित गावकरी यांच्या मागणीनुसार विशेष बाब म्हणून करण्याचा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागास सादर करण्यास तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळात मान्यता प्रदान केली आहे. यात मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर ४१३ घरासाठी ११० कोटी ,अंतुर्ली १५० घरांसाठी ९.७५ कोटी,धामनदे ७१ घरांसाठी ६.८१ कोटी, पिंप्री नांदू १२८ घरांसाठी ८.५० कोटी, बेलसवाडी ३५ घरांसाठी ३.९० कोटी, रावेर तालुक्यातील मांगलवाडी ३५०घरांसाठी ४० कोटी, तांदलवाडी ७५घरांसाठी १०.४२ कोटी, नेहते १२८ घरांसाठी २४.९४कोटी,वाघाडी ४९३घरांसाठी १००.९३कोटी, ऐनपूर २५०घरांसाठी ३९.०२ कोटी, भामलवाडी १९९घरांसाठी ३०१.३७ कोटी असे सुमारे २,२६२ घरांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक घरे संपादन, जमीन संपादन व नागरी सुविधा यासाठी एकंदर रु. ३८०.७५ कोटी च्या खर्चास मदत व पुनर्वसन विभागाची मान्यता मिळणेबाबतचा प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयाने सादर केला असुन त्यावर कार्यवाही शासन स्तरावर प्रगतित आहे. हतनूर प्रकाल्याच्या पुराचा पश्चजल अभ्यास आय.आय.टी. मुंबई या संस्थेमार्फत करण्यात येत असून , त्यांचेकडून उपाययोजनेचे सविस्तर सादरीकरण प्रस्तावित आहे.