जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । शिकाऊ उमेदवारांना बस चालविण्यास दिल्यानंतर आगारातील संपकरी कर्मचाऱ्यांना भडकवल्याप्रकरणी सोमवारी रोजी जिल्हा पेठ पोलिसांनी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे पदाधिकारी गोपाळ पाटील यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
गोपाळ पाटील हे महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यासंदर्भात सुरू असलेल्या संपातील कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम करीत असल्याची तक्रार कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जिल्हा पेठ पोलिसांकडे केली होती. या तक्रारीनुसार जिल्हा पेठ पोलिसांनी गोपाळ पाटील यांना सोमवारी जळगाव आगारातून ताब्यात घेऊन, पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी त्यांच्या सीआरपीसी १०७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच गोपाल पाटील यांना शांततेचा भंग करू नये याबाबत समज देण्यात आल्याची माहिती जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी यांनी दिली.