प्रा. वंदना महाजन यांना जळगाव विद्यापीठातर्फे डॉक्टरेट प्रदान
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा.वंदना महाजन यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या वतीने डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते पी एचडी ही पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी यंत्र अभियांत्रिकी मध्ये मटेरिअल कोटींग्स या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला होता. आपल्या संशोधनात आटोमोबाईल क्षैत्रात मटेरियल कोटींग्सच्या उपयोगावर माहिती सादर केली आहे. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे चे प्रा.डॉ.एम.जे.साबळे व रायसोनी इंजिनीअरिंग कॉलेजचे प्रा. डॉ. संजय शेखावत यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुहास गाजरे,विभाग प्रमुख डॉ एस टी वगगे, बेंडाळे महाविद्यालयाचे डॉ.सुहास पाटील, संजय सपकाळे व सहकार्यानी अभिनंदन केले आहे .स्थापत्य अभियंता प्रमोद माळी यांच्या त्या पत्नी तर कवि नीलकंठ महाजन यांच्या त्या कन्या आहे.