---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी शरद पवारांचे नाव पुढे, पण पवार म्हणतात..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । राष्ट्रपतीपदाची निवडणूक (President Election) १८ जुलै रोजी होणार असून या पदासाठी कोण उमेदवार असेल, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अश्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पुढे आले आहे. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही पवारांच्या नावासाठी अनुकुलता दर्शवले आहे. मात्र, विरोधकांच्या बैठकीपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे.

sharad pawar 1 jpg webp

मी राष्ट्रपतीपदाच्या रेसमध्ये नाहीये, असं खुद्द शरद पवार यांनीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत पवारांच्याच नावावर चर्चा होणार की आणखी काही नावं राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पुढे येतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

---Advertisement---

काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्र आले
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांना आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळाला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचे नाव पुढे आल्यास पक्ष त्यांना पाठिंबा देईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव पुढे आल्यास महाराष्ट्र काँग्रेसचाही पाठींबा आहे, असे नाना पटोले म्हणाले. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार असून 21 जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---