जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२३ । गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१८ जून रोजी राष्ट्रीय आरोग्य सेवा परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासंदर्भात आज बुधवार दि.१४ जून रोजी आढावा बैठक झाली असून परिषदेची तयारी पूर्णत्वास गेली आहे.
डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमधील काऊंसिल हॉल येथे बुधवार दि.१४ जून रोजी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, आयएमएच्या सचिव डॉ.तुषार बेंडाळे, सदस्य डॉ.रागिनी पाटील, डॉ.जितेंद्र नारखेडे, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ.कैलास वाघ, पीएसएम विभाग प्रमुख डॉ.दिलीप ढेकळे, प्रशांत गुड्डेटी, विजय मोरे आदि उपस्थीत होते.
डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमधील डॉ.केतकी हॉल येथे रविवार १८ जून रोजी सकाळी १० ते २ या वेळेत आयोजित आरोग्य सेवा परिषदेस प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून नॅशनल प्रेसिडेंट इलेक्ट आयएमए डॉ.आर.व्ही.अशोकन यांची उपस्थीती लाभणार आहे. याशिवाय भूतपूर्व नॅशनल प्रेसिडेंट आयएमए आणि जळगावसह देशभरातून आयएमए मेंबर्स येथे येणार आहे.
या कार्यक्रमाची पूर्वतयारी बघण्यासाठी आज बैठक घेण्यात आली असून सर्वच व्यवस्थांची पाहणी करण्यात आली. यावेळी विविध समित्यांचे प्रमुख उपस्थीत होते तर डॉ.दिलीप ढेकळे, डॉ.कैलास वाघ व डॉ.रागिनी पाटील यांनी कार्यक्रमाची रुपरेषा यावेळी सांगितली. या कार्यक्रमात मुख्यत्वे करुन तरुण डॉक्टरांच्या समस्या, संघटन व उपाय या विविध विषयावर मंथन होणार आहे. एकंदरीतच या भव्य दिव्य कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वाकडे गेली आहे.