---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस झोडपणार; 25 जिल्ह्यांना अलर्ट

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२५ । केरळात मान्सूनचे लवकरच आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून मात्र त्यापूर्वी महाराष्ट्रासह देशातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झोडपून काढत आहे. राज्यात मागच्या काही दिवसापासून पाऊस सुरु आहे. राज्यात आजही पावसाचे वातावरण आहे. हवामान खात्याने आज राज्यातील जळगावसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

Rain

राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण कायम राहणार असून, काही भागात पावसाची शक्यता असल्याने अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पुणे, पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये आकाश ढगाळ राहणार असून, दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

---Advertisement---

राज्याच्या या भागात पावसाचा अलर्ट
हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये प्रचंड विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment