---Advertisement---
गुन्हे यावल

फैजपुरच्या प्रवचनकार महाराजने केले असे कृत्य…पोलिसात गुन्हा दाखल

new project (3)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज। १९ मे २०२१  फैजपूर येथील एका प्रसिद्ध धार्मिक प्रवचनकार महाराजने एक अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक आणि शैक्षणिक नगरी समजल्या जाणाऱ्या फैजपूरमध्ये या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

new project (3)

याबाबत असे की, फैजपूर येथील खंडोबा वाडी च्या मागील बाजूस आपल्या पत्नीसह वास्तव्यास असलेल्या पुर्णानंद महाराज नामक ३५ ते ४० वर्षीय धार्मिक प्रवचनकार महाराजाने त्याच परिसरात राहणाऱ्या एका १४ ते १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. त्याला चोप देऊन फैजपूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---Advertisement---

सदर अल्पवयीन मुलीच्या आजोबांच्या दुचाकी विक्री विषयी चर्चा करण्यासाठी हा महाराज गेला असता त्याठिकाणी त्याने या अल्पवयीन मुलीची छेड काढली.मुलीने ताबडतोब आपल्या कुटुंबातील सदस्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली असता या पुर्णानंद नामक महाराज ला चांगलाच चोप देऊन फैजपूर पोलीस स्टेशन ला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

या गुन्ह्यातील पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याने नियमानुसार महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याबाबत इन कॅमेरा मुलीचा जबाब घेऊन गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत फैजपूर पोलीस स्टेशन मधे सुरू होती.मुलगी अल्पवयीन असल्याने बाल अत्याचार विरोधी (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सदर पुर्णानंद नामक महाराज याने याअगोदर देखील २-३ वेळेस अशा प्रकारचे अश्लील व असभ्य कृत्य केले असून काही प्रतिष्ठित लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यावेळी प्रकरण जास्त न वाढता मिटविण्यात आले होते.काही दिवसांपूर्वी तर या ‘पुर्णानंद’ ने आपल्या ‘आनंदासाठी’ एका तरुणीस प्रेमाच्या जाळ्यात अडकवून चक्क पळवून आणले असून नंतर त्याने तिच्यासोबत विवाह करुन संसार देखील थाटला आहे.मात्र तो विकृत व्यक्ती इतक्यावरच थांबला नाही तर काल पुन्हा त्याने असाच विकृत प्रकार करण्याचा प्रयत्न केला आणि चिडलेल्या लोकांनी देखील त्यास चांगलाच बदडून काढला असल्याचे बोलले जात आहे.

आता या प्रकरणात फैजपूर पोलीस अधिकारी कोणती कारवाई करणार? या विकृत महाराज वर कोणकोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात येईल? सदर अल्पवयीन मुलीचे पालक कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---