जळगाव महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी प्रकाश बालानी, तर प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील

जानेवारी 21, 2026 5:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२६ । जळगाव महापालिकेत महायुतीने घवघवीत यश संपादित करत बहुमत मिळवले आहे. यामध्ये भाजपने ४६ पैकी ४६ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. एकीकडे भाजपला मोठे यश मिळाले तरी महापालिकेच्या गटनेतेपदी कोणाची निवड होणार याकडे लक्ष लागले होते. अशातच आज बुधवारी भाजपने गटनेता घोषित केला आहे.

prakash balani

जळगाव महापालिकेत भाजपने प्रकाश बालानी यांची गटनेतापदी निवड केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गट महापालिकेतील कामकाज पुढे नेणार आहे.

Advertisements

उपगटनेतेपदी नितीन बरडे यांची नियुक्ती करण्यात आली असून पक्षांतर्गत समन्वय, सभागृहातील भूमिका तसेच निर्णय प्रक्रियेत त्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. तर प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सभागृहातील शिस्त, नियोजन आणि रणनीती आखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Advertisements

काल रात्री उशिरा भाजपच्या गट नोंदणीसाठी आयोजित बैठकीत गटनेत्याच्या नावाची घोषणा होऊ शकली नाही. गटनेता कोण? हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले.

आज अखेर भाजपकडून गटनेता, उपगटनेता जाहीर झाला.दरम्यान भाजपने महापालिकेच्या महापौर पदावर दावा केला असून महापौर पदाची खुर्ची कोणाला मिळणार हे महापौरपदाच्या आरक्षण सोडतीनंतरच जाहीर होणार आहे. यामुळे इच्छुक नगरसेवकांची धाकधूक वाढली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now