जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । प्रगती पॅनलचे अध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील व त्यांच्या जाहीर झालेल्या १४ उमेदवारांनी शुक्रवार दि.१५ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांनी प्रगती पॅनलला शुभेच्छा दिल्या.
प्रगती पॅनलचे अध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील व त्यांच्या जाहीर झालेल्या १४ उमेदवारांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची आखिल भारतीय कोळी समाज महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रगती पॅनलकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील व चंद्रकांत सोनवणे यांनी प्रगती पॅनलला शुभम भवतु अशा आशिर्वादरुपी सदिच्छा दिल्या. याप्रसंगी रावसाहेब मांगो पाटील, आर.जे. पाटील, राजेंद्र पुंडलिक सांळुखे, विजय पवार, समाधान पाटील, प्राध्यापक ए.टी. पवार, योगेश सनेर, एस.टी.चौधरी, नरु सपकाळे, नाना पाटील, निलेश पाटील, विपिन पाटील, दिपक गिरासे, शिवाजी साठे, सचिन पाटील, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आरोग्य सेविका प्रेमलता पाटील यांसह पदाधिकारी उपस्थित होते.