⁠ 
सोमवार, ऑक्टोबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या वृत्तावर प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या वृत्तावर प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२४ । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी आता परत भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान, खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या वृत्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रियादेत खडसेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
एकनाथ खडसे यांचं मन राष्ट्रवादीत रमत नव्हतं, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. “आम्हाला माहीत होतं की एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार आहेत. त्यांचं मन रमत नव्हतं. शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेची जागा दिली. पण त्यांचं मन त्यात रमलं नाही. बरं झालं ते पुन्हा भाजपात जात आहेत. आता आम्ही एकत्र काम करू, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिल्ली.

एकनाथ खडसे यांना राज्यपालाची संधी मिळणार का? असा प्रश्न प्रफुल्ल पटेल यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “खडसेंना कोणती संधी मिळते हे मला माहीत नाही. पण महाराष्ट्रमध्ये भाजप रुजवण्यात त्यांच्या फार मोलाचा वाटा आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि एकनाथ खडसे यांनी त्या काळात भाजप वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यामुळे त्यांचं मन भाजप आहे”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.