⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | सरकारी योजना | घरकुल योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करायचा? कोण पात्र असेल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

घरकुल योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करायचा? कोण पात्र असेल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । केंद्र आणि राज्य सरकारकडून देशातील प्रत्येक गोर-गरीब लोकांसाठी विविध योजना राबवीत आहे. यात केंद्र सरकारने इंदिरा गांधी आवास योजनेंतर्गत गरीब आणि दुर्बल घटकातील लोकांसाठी सुरू केली आहे. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही आणि ज्यांना राहण्यासाठी निवास व्यवस्था नाही त्यांच्यासाठी ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ देशातील सर्व राज्यातील जनतेला दिला जात आहे. इंदिरा गांधी आवास योजनेंतर्गत लोकांना घरबांधणीची सुविधा दिली जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना / इंदिरा गांधी आवास योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करावा तसेच या योजनेसाठी कोण पात्र असणार याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.. चला तर मंग जाणून घेऊया

पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेचा उद्देश काय ?
देशातील जे लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, जे लोक झोपडपट्टीत राहतात, ज्यांच्याकडे स्वतःच असं पक्क घर नाही , तसेच ज्याच्याकडे घर विकत घेण्यासाठी पैसेही नाहीत,अशा लोक इंदिरा गांधींच्या अंतर्गत आवास योजना, ग्रामीण भागात पक्की घरे देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना स्वतःच पक्के देण्याचं या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. अश्या प्रकारे संपूर्ण देश झोपडपट्टी मुक्त करण्याचे उद्दिष्ट्य या योजनेअंतर्गत साकारले जाणार आहे. त्यासाठी सन २०२२ पर्यंत देशातील सर्व लोकांसाठी घरांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. तसेच या योजनेंतर्गत राष्ट्रीय तांत्रिक सहाय्य एजन्सी (एसईसीसी) ची स्थापना केली गेली आहे, ज्या एजन्सीचे काम लोकांना घरांच्या बांधकामात तांत्रिक मदत करणे असणार आहे.

इंदिरा गांधी आवास योजनेचे लाभ कोणते ?
देशातील गरीब लोकांकडे ज्यांची स्वत: ची घरे नाहीत त्यांना या योजनेंतर्गत स्वतःची घरे दिली जातील.
केंद्र सरकार या योजनेमार्फत २०२२ पर्यंत “हाऊस फॉर ऑल” अभियानांतर्गत सर्वांचे घर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करीत आहे.
इंदिरा आवास अंतर्गत आर्थिक सहाय्य रक्कम ही साध्या भागात ७०,०००/-रुपयापासून ते १,२०,०००/- रुपयांपर्यंत तसेच डोंगराळ किंवा कठीण भागात घर बांधण्यासाठी ७५,०००/- रुपयांपासून ते १,३०,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
इंदिरा आवास योजनेअंतर्गत हि दिलेली आर्थिक रक्कम हि लाभार्थी गरीब कुटुंबाला ३ हप्त्यांमध्ये दिली जाते.
सर्व लाभार्थ्यांना दिलेली मदत थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) च्या माध्यमातून त्याच्या आधार संलग्न बँकेत जमा केली जाते.
या योजनेसोबतचस्वच्छ भारत मिशन-ग्रामीण (एसबीएम-जी) आणि मनरेगा यांच्या अंतर्गत शौचालयांच्या बांधकामासाठी १२,०००/- रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली लाभार्थी कुटुंबाला शौचालयांच्या बांधकामासाठी केली जात आहे.
घरकुल अनुदान व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत ९० दिवसांच्या अकुशल मजुरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते.

लाभार्थ्यास मिळणारे अनुदान खालील ४ हप्त्यामध्ये वितरण केले जाते
घरकुल योजना (प्रधानमंत्री आवास योजना) अंतर्गत लाभार्थ्यास मिळणारे अनुदान खालील ४ हप्त्यामध्ये वितरण केले जाते.
१) घरकुल मंजुरी नंतर लगेच दिला जाणारा पहिला हप्ता – रु. १५०००/-
२) घरकूलाचे बांधकाम पाया पर्यंत झाल्यावर दिला जाणारा दुसरा हप्ता – रु. ४५०००/-
३) घरकुलाचे बांधकाम छता पर्यंत झाल्यावर दिला जाणारा तिसरा हप्ता – रु.४००००/-
४) घरकुलाचे बांधकाम शौचालयासह बांधकाम पूर्ण झाल्यावर दिला जाणारा चौथा हप्ता – रु. २००००/-
एकूण घरकुल अनुदान रक्कम – रु. १,२०,०००/- (एक लाख वीस हजार).

इंदिरा गांधी आवास योजनेसाठी पात्रता काय असणार?
इंदिरा गांधी आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.
ज्याला घर विकत घ्यायचे आहे किंवा घर बांधायचे आहे तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
जे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, बिनशेती कर्मचारी, अल्पसंख्यांक, प्रवर्गातीलगरीब कुटुंबे या योजनेसाठी पात्र असतील.
ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही , तसेच जे रस्त्यावर रस्त्यावर किंवा झोपडपट्टीत आयुष्य घालवतात ते या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र असतील.
जर कोणी नोकरी करत असेल, तर त्याला उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ६ महिन्यांची स्लिप, आयटीआर अर्ज करताना सादर करावे लागतील.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला या योजनेअंतर्गत घराचा लाभ घेता येणार आहे.
सरकारी नोकरी करणाऱ्या कुटुंबाला या योजनेअंर्गत लाभ घेता येणार नाही.

इंदिरा गांधी आवास योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत?
अपंग नागरिक
माजी सेवा कर्मचारी
महिला
अनुसूचित जाती/ जमाती कुटुंब
समाजातील उपेक्षित विभागातील नागरिक
मुक्त बंधपत्रित कामगार
विधवा महिला
नातेवाईक किंवा संसदेतील कर्मचारी कारवाईत मारले गेलेले
इंदिरा गांधी आवास योजना 2022 ऑनलाईन अप्लिकेशनसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
आधार कार्ड
मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड
जॉब कार्डची साक्षांकित फोटो कॉपी
उत्पन्न प्रमाणपत्र
बीपीएल श्रेणी प्रमाणपत्र
मोबाइल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो

इंदिरा आवास योजना ऑनलाईन अर्ज (online apply PMAY 2022)
अधिकृत संकेतस्थळ – pmayg.nic.in/netiay/home.aspx
आवास योजना ऑनलाईन अर्ज- pmaymis.gov.in

केंद्र सरकारने ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे, ज्याद्वारे लोक पोर्टलला भेट देऊ शकतात. त्याअंतर्गत ज्यांची नावे यादीमध्ये समाविष्ट केली जातील त्यांना सरकार पक्की घरे प्रदान करेल. याशिवाय ज्यांचे नाव या यादीमध्ये दिसत नाही, ते पुन्हा अर्ज करू शकतात. आपल्याला आपले नाव इंदिरा गांधी योजना यादी 2022 मध्ये देखील पाहू इच्छित शकतात.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.