पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) मध्ये इंजिनिअर्सना नोकरीची मोठी संधी आहे.पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून फील्ड इंजिनिअर पदाच्या एकूण १३७ जागांसाठी भरती प्रकीर्या निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी powergridindia.com ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची प्रक्रिया 13 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2021 आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन वाचून घेणं आवश्यक आहे.
या पदांसाठी होणार भरती?
१) फील्ड अभियंता (इलेक्ट्रिकल)- 48
२) फील्ड अभियंता (सिव्हिल) – 17
३) फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल) – 50
४) फील्ड सुपरवायझर (सिव्हिल) – 22
पात्रता :
उमेदवारांकडे डिप्लोमा B.Sc, BE/ B.Tech, M.Tech/ ME पदवी असावी.
वय मर्यादा :
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 27 ऑगस्ट 2021 रोजी 29 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
परीक्षा फी : [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पद क्र.1 & 2: General/OBC: ₹400/-
पद क्र.3 & 4: General/OBC: ₹300/-
अर्ज कसा करायचा?
फील्ड इंजिनिअर आणि फील्ड सुपरवायझर या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना POWERGRID च्या powergrid.in ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर करिअर विभाग आणि नंतर नोकरीच्या संधी नंतर “कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर फील्ड इंजिनियर आणि फील्ड सुपरवायझर या लिंक वर क्लिक करा अर्ज प्रक्रिया 27 ऑगस्टपर्यंत सुरू राहील.
पगार :
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 30,000 ते 1,20,000 रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड स्क्रीनिंग टेस्ट, वैयक्तिक मुलाखतीमधील कामगिरीच्या आधारे केली जाईल.