⁠ 
शनिवार, जून 22, 2024

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक स्क्रीझोफ्रेनिया दिनानिमित्त पोस्टर स्पर्धेचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२४ । जळगाव येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या मानसिक आरोग्य विभागातर्फे जागतिक स्क्रीझोफ्रेनिया दिनानिमीत्‍त पोस्टर स्पर्धा आयोजन करण्यात आले. यात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेतला.

स्पर्धेचे उदघाटन प्राचार्य विशाखा गणविर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी मानसिक आरोग्य विभागाच्या प्रमुख प्रा. अश्‍वीनी वैदय या उपस्थीत होत्या. विदयार्थ्यांनी मानसिक आजाराचे स्वरूप या पोस्टरच्या माध्यमातून चित्राव्दारे सादर केले. परिक्षक म्हणून प्रा. हेमांगी मुरकुटे यांनी काम पाहीले. यावेळी बोलतांना प्राचार्य विशाखा गणविर यांनी मानसिक आजाराचे स्वरूप व आजच्या काळात जनजागृती करणे गरजेचे असल्याचे सांगितले तर मानसिक आरोग्य विभागप्रमुख प्रा. अश्‍वीनी वैदय यांनी आजच्या धकाधकीच्या जिवनात विविध प्रकारच्या, स्वभावाच्या व्यक्‍तीमध्ये मानसिक आजार बळावत असून लोक काय म्हणतील या भितीने उपचाराकडे पाठ फिरवली जात आहे.

या पोस्टर व प्रसिध्दी माध्यमातून जनजागृती अधिक तिव्र करण्याचे गरज असल्याचे मत व्यक्‍त केले. निवडक पोस्टरला प्रमाणपत्र व मानचिन्हाव्दारे सन्मानित करण्यात आले. यशस्वीतेसाठी मानसिक आरोग्य विभाग व शिक्षकेतर कर्मचा—यांनी परिश्रम घेतले.