जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । आजही पोस्ट ऑफिस हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. येथे पैशाच्या हमीसह चांगला परतावा मिळतो. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा स्कीमबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये ग्राहकांना दरवर्षी 1,11,000 रुपये मिळतील. चला तर जाणून घेऊयात या खास योजनेबद्दल..
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर गुंतवणूकदारांना मोठा लाभ मिळतो. या सरकारी योजनेत तुम्हाला ७.४ टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत आहे. यासोबतच सरकारकडून दर तिमाहीत व्याजदरांचा आढावा घेतला जातो. त्यामुळे यामध्ये व्याजाची रक्कमही बदलू शकते.या सरकारी योजनेत चांगल्या रिटर्न्ससोबतच टॅक्स बेनिफिटचाही फायदा आहे. आज आम्ही तुम्हाला या योजनेत पैसे गुंतवून दरवर्षी 1 लाखांपेक्षा जास्त कसे कमवू शकता हे सांगणार आहोत.
तुम्ही किती गुंतवणूक करू शकता?
या सरकारी योजनेत तुम्हाला किमान 1000 रुपये गुंतवावे लागतील. यानंतर, तुम्ही त्यातील गुंतवणूक 1000 च्या पटीत वाढवू शकता. यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 15 लाखांची गुंतवणूक करू शकता. त्याची मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे, परंतु खातेदार ही योजना आणखी 3 वर्षांसाठी वाढवू शकतात.
1.5 लाखांपर्यंत कर सूट मिळेल
तुम्हाला आयकराच्या 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत सूट मिळू शकते. त्याच वेळी, तुम्हाला मिळणारे व्याज 50,000 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल.
111,000 रुपये कसे मिळवायचे
जर एखाद्या गुंतवणूकदाराने या सरकारी योजनेत 15 लाख रुपये म्हणजेच जास्तीत जास्त रक्कम जमा केली असेल आणि त्याला 7.4 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत असेल, तर यानुसार त्याला प्रत्येक तिमाहीत 27750 रुपये मिळतील. त्याच वेळी, जर आपण त्याची वार्षिक रक्कम पाहिली तर ती 1,11,000 रुपये होईल.
संयुक्त खात्यात दुप्पट नफा होईल
तुम्ही संयुक्त खाते उघडल्यास, गुंतवणूकीची कमाल मर्यादा ३० लाख रुपये होईल. गुंतवणुकीची रक्कम दुप्पट केल्यानंतर, व्याज दुप्पट करून 2.2 लाख रुपये होईल.