---Advertisement---
सरकारी योजना

पोस्टाची भारी योजना ; ७०५ रुपये भरा अन मॅच्युरिटीवर 17.30 लाख मिळणार

post office yojana
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२१ । तुम्ही जर पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी गुड न्यूज आहे. पोस्ट ऑफिस अशी एक पॉलिसी आहेत जे पोस्टल लाईफ इन्शुरन्स IRDAI च्या कक्षेत येत नाहीत आणि यामध्ये पॉलिसीधारकाला बंपर बोनसचा लाभदेखील मिळतो. पोस्ट ऑफिसकडून दरवर्षी बोनस जाहीर केला जातो.

post office yojana

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा असे या विमा पॉलिसीचे नाव आहे. ती विशेषतः ग्रामीण भारतातील गरीब लोकांसाठी तयार केली गेली. त्यासाठी तुमचं किमान प्रवेश वय 19 वर्षे आणि कमाल प्रवेश वय 55 वर्षे आहे. किमान विमा रक्कम 10 हजार रुपये आणि कमाल विमा रक्कम 10 लाख रुपये मिळते. कर्जाची सुविधा चार वर्षांनंतर उपलब्ध आहे. ही पॉलिसी तीन वर्षांनंतर सरेंडर करता येते. इंडिया पोस्टल लाईफ इन्शुरन्स मोबाईल अॅपवर उपलब्ध माहितीनुसार बोनस प्रति हजार विमा रक्कम 60 रुपये आहे. म्हणजे एक लाखाच्या विमा रकमेवर एक वर्षाचा बोनस 6000 रुपये आहे.

---Advertisement---

RPLI योजनेंतर्गत प्रीमियमच्या रकमेबद्दल बोलायचे झाल्यास जर कोणी 19 वर्षांच्या वयात 5 लाखांची विमा रक्कम विकत घेतली आणि त्याचे मॅच्युरिटी वय 60 वर्षे असेल तर प्रत्येक महिन्यासाठी प्रीमियमची रक्कम 705 रुपये असेल. 58 वर्षांच्या मॅच्युरिटीवर प्रीमियम 732 रुपये, 55 वर्षांच्या मॅच्युरिटीवर प्रीमियम 758 रुपये आणि 50 वर्षांच्या मॅच्युरिटीवर प्रीमियम 810 रुपये असेल.

60 वर्षांच्या मॅच्युरिटीसाठी रक्कम 17.30 लाख, 58 वर्षांसाठी 16.70 लाख, 55 वर्षांसाठी 15.80 लाख आणि 50 वर्षांसाठी 14.30 लाख रुपये असेल. बोनसची गणना करणे अगदी सोपे आहे. हे प्रति वर्ष 60 रुपये प्रति विमा रक्कम आहे. त्यानुसार एक लाखाच्या विमा रकमेवरील बोनस 6000 रुपये झाला. 5 लाखांच्या विमा रकमेवर वार्षिक बोनस 30 हजार रुपये झाला. जर 18 वर्षांच्या मुलाने 60 वर्षांची योजना निवडली तर 41 वर्षांमध्ये एकूण बोनस 12.30 लाख रुपये आहे. या 41 वर्षांत तो प्रीमियम म्हणून 3.46 लाख रुपये जमा करेल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---