जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२५ । पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये तैनात असलेले बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ हे २३ एप्रिल रोजी अनावधानाने पाकिस्तानच्या सीमेत पोहचला होता. त्याला पाकिस्तानी रेजंर्सनी ताब्यात घेतले होते. मात्र गेल्या आठवड्यात भारताने पहलगाम हल्ल्याचा बदल घेण्यासाठी राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान हादरला आहे.

याचा परिणाम असा झाला की पाकिस्तानी रेंजर्सनी चुकून सीमा ओलांडलेल्या बीएसएफ जवान पूर्णम कुमार यांना २० दिवसानंतर भारताच्या ताब्यात दिले. पूर्णम कुमार शॉ अटारी सीमेवरून भारतात परतले आहेतत्यांच्या सुटकेनंतर भारतात त्यांचे स्वागत झाले. पूर्णम कुमार यांच्या कुटुंबीयांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या सुरक्षित परतण्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ला झाला होता. सीमेवर कार्यरत असणारा पूर्णम कुमार हा २३ एप्रिल रोजी अनावधानाने पाकिस्तानमध्ये पोहचला होता. दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, त्यामुळे भारताने आक्रम भूमिका घेतली. दहशतवादाविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानात जाऊन ९ दहशतवादी तळ नष्ट केले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध जास्तच ताणले गेले. त्यामुळे पूर्णम भारतात परत येणार का? अशी काळजी त्याच्या कुटुंबियाला होती. पण अखेर पाकिस्तान भारतापुढे झुकला असून पूर्णमला परत पाठवले आहे.
पाकिस्तानने बुधवारी बीएसएफ जवान पूर्णम कुमार साहू यांना भारताच्या ताब्यात दिले. 23 एप्रिल रोजी त्यांना पकडण्यात आले होते. पंजाबमधील अटारी-वाघा सीमेवर सकाळी 10:30 वाजता पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना बीएसएफच्या हवाली केले. ही प्रक्रिया शांततेने आणि स्थापित प्रोटोकॉलनुसार पार पडली, असे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले.