---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली; कोण काय म्हणालं वाचा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२४ । राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि शरद पवार गटाच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांच्यात पुन्हा जुंपली आहे. स्वतःचं कर्तुत्व नसताना वडिलांच्या नावावर सुरक्षित असलेला मतदारसंघ ही त्यांना जिंकता आला नाही, त्यांनी बोलू नये, असा टोला लगावला आहे.

rohini rupali

त्यांच्या त्यांच्या या टीकेला रोहिणी खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. रूपाली चाकणकर ह्या बाप बदलणांऱ्या सारख्या आहेत’ असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. त्यांनी बाप बदलवले असून त्यांना जनाधार नाही, अशा लोकांच्या वक्तव्याला आपण महत्व देत नसल्याचे प्रत्युत्तर रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांना दिले आहे.

---Advertisement---

नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
रूपाली चाकणकर जळगाव दौऱ्यावर असून त्यांनी मुक्ताईनगर मधील आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी रोहिणी खडसेंवर टीका केली. दरम्यान लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या दीड हजार रुपयात काय येतं असा प्रश्न रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला होता. यावरून बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसाला दीड हजाराची किंमत कशी कळणार..आम्ही आंदोलनातून मोठे झालेलो आहोत आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठलाही मतदारसंघात ठेवला नसल्याचे म्हणत रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर हल्लाबोल केला आहे.

रोहिणी खडसेंचं प्रत्युत्तर?
रुपाली चाकणकर यांच्या टीकेला रोहिणी खडसेंनी प्रत्युत्तर दिले. “रूपाली चाकणकर यांना बाप बदलणं सोपं आहे. आधी पवार साहेबांसोबत होत्या, नंतर सुप्रिया सुळे. ज्या जनतेने सर्व दिलं, त्या जनतेच्या होऊ शकत नाहीत, त्या आपल्या काय होतील?” ज्यांचं नगरपालिकेत डिपॉझिट जप्त झालंय अशा लोकांचा जनाधारक शिल्लक राहिलेला नाहीय.

“रूपाली चाकणकर ह्या शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने सध्या पद भोगत आहेत. शरद पवार साहेबांच्या भरोशावर आतापर्यंत पद यांना मिळत आली आहेत” रूपाली चाकणकरांच्या वक्तव्याला मी फार महत्त्व देत नाही” असं रोहिणी खडसे म्हणाल्या.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---