---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

Breaking : वाळू व्यावसायिकाकडून लाच मागणे भोवले, पोलीस कर्मचाऱ्यासह पंटर जाळ्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२३ । जिल्ह्यातील अडावद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने एक पंटरच्या माध्यमातून चार हजारांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. वाळू व्यावसायिकाकडून ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करू देण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याने ही कारवाई झाली आहे.

lach jpg webp webp

वाळूचे ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करू देण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणार्‍या अडावदमधील पोलीस कर्मचार्‍यास जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल योगेश गोसावी व खाजगी पंटर चंद्रकांत कोळी असे अटकेतील आरोपींचे नावे आहेत.

---Advertisement---

तक्रारदार यांनी कर्जाद्वारे ट्रॅक्टर घेतले असून वाळू वाहतूक करू देण्यासाठी व कारवाई न होण्यासाठी गोसावी यांनी पाच हजारांची लाच मागितली मात्र चार हजारात तडजोड झाल्यानंतर तक्रारीअंती सापळा रचण्यात आला. अडावद पोलीस स्टेशन आवारात खाजगी पंटरने लाच स्वीकारताच गोसावी यांनाही अटक करण्यात आली. एसीबीचे उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---