---Advertisement---
बातम्या

कर्तव्यावरच असताना तरुण पोलिसाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२३ । भुसावळ शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस सागर दिलीप देहाडे यांचा कर्तव्यावरच असताना ह्रदयविकाराच्या तिव्र धक्याने मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली. तरुण पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याने पोलीस वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.

bhusawal police jpg webp webp

जळगाव येथे वास्तव्यास असलेला मात्र शहर पोलीस ठाण्यात प्रथमच नियुक्ती मिळालेला सागर देहाडे याने बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यात हजेरी लावली व समन्स बजावणीसाठी निघाल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागल्याने ही बाब त्याने सहकार्‍याला सांगितल्यानंतर त्यास ट्रामा केअर सेंटरला नेण्यात आले येथे त्याचा डॉ.मयूर चौधरी यांनी ईसीजी काढला मात्र हृदयविकाराचा मोठा झटका आल्याने डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेजमध्ये हलवत असतानाच त्याचा मृत्यू ओढवला.

---Advertisement---

मृत सागर विवाहीत असुन एक लहान मुलगा आहे तर आता पत्नी गरोदर आहे. तरुण पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याने पोलीस वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. दरम्यान, कामाचा अधिक ताण, वेळेवर जेवण नसणे आणि अपुर्ण झोप अशा दिनचर्येमुळे अशा घटना घडत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---