⁠ 
[rank_math_breadcrumb]

जळगावात बनावट दारू बनविणाऱ्याच्या घरावर पोलिसांची धाड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील नवल नगर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये देशी-विदेशी बनावट दारू तयार करणाऱ्याच्या घरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दारू तयार करणाऱ्यालाही ताब्यात घेतले आहे.

शिरसोली रस्त्यावरील नवलनगर भागात जितेंद्र वैद्यनाथ भाट (वय 55) हा त्याच्या मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये देशी-विदेशी बनावट दारू तयार करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी छापा मारून जितेंद्र वैद्यनाथ भाट हा बनावट दारू तयार करीत असताना मिळून आला. त्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूच्या भरलेल्या बाटल्या व खाली बाटल्या मिळून आल्या. तो बनावट दारू तयार करत असल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या जवळ टॅंगो पंच देशी 38 नग बाटल्या, मॅकडॉल कंपनीच्या 15 नग व रॉयल स्टॅग कंपनीच्या 14 नग विदेशी दारूच्या बाटल्या अशा तयार नकली दारूच्या बाटल्या , बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन व विविध कंपनीच्या 2500 नग मोकळ्या दारूच्या बाटल्या व बाटल्यांचे बूच असे मिळून आले होते . या छाप्यात स्थानिक गुन्हे शाखेने 84 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही बनावट दारू मानवी जीवितास अपायकारक असल्याने व घातक रसायना द्वारे ही बनावट दारू तयार करत असल्यामुळे त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असुन न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. यादरम्यान त्याने रसायन कुठून आणले व बनावट दारू कोणाला विक्री करणार होता व करीत होता याची माहिती घेण्यात येत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.