⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | मेहरूण परिसरात जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा

मेहरूण परिसरात जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । येथील मेहरूण परिसरात सट्टा, जुगाराच्या अड्ड्यावर एमआयडीसी पोलीसांनी धाड टाकून जुगाराचे साहित्य व रोकड जमा करीत ११ जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहरूण परिसरातील अशोक किराणा चौकात काही जण सट्टा व जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पो.न. गणेश शिरसाळे, पो.ना. सचिन पाटील, चेतन सोनवणे, पो.कॉ. चंद्रकांत पाटील, पो.कॉ. छगन तायडे यांनी १९ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता अशोक किराणा चौकात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलीसांनी जुगार खेळण्याचे साहित्य, ६ हजार ३०० रूपयांची रोकड असा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच सिराज सैय्यद शेख सलीम (वय-४९) रा. शेरा चौक, मास्टर कॉलनी, शेख जावेद शेख सलीम (वय-२८) रा. अशोक किराणा चौक, अरूण सुपडू भदाणे (वय-५०) रा. मेहरूण, विजय रामभाऊ सोनवणे (वय-६०) रा. राम नगर, पंकज अरूण महाजन (वय-२३) रा. अयोध्या नगर, सुपडू चावदास सपकाळे (व-४२) रा. सुनसगाव ता. भुसावळ, अजय ज्ञानेश्वर कोळी (वय-३५) रा. मोहाडी ता. जळगाव, मजीत शेख बाबू शेख (वय-४६) रा. रामेश्वर कॉलनी, कडू राजाराम परखड (वय-५९) रा. रामेश्वर कॉलनी, जगदीश श्याम पाटील (वय-३६) रा. मेहरूण आणि लियाकत अली अजगर अली (वय-५३) रा. लक्ष्मी नगर जळगाव या ११ जणांना ताब्यात घेतले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात पो.कॉ. छगन तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.