Bhusawal : जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, सात जणांना अटक

ऑक्टोबर 25, 2025 4:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील छत्रपती शिवाजी नगर भागात टपरीच्या आडोशाला झन्ना मन्ना जुगार खेळणाऱ्यांवर बाजारपेठ पोलिसांनी मध्यरात्री कारवाई केली. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली. संशयित आरोपींकडून जुगाराचे साहित्य आणि रोख १ हजार ९१० रुपये जप्त करण्यात आले.

jugar

बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांना शिवाजी नगर परिसरात काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी मनोज भागवत गाळफाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Advertisements

याना झाली अटक

या कारवाईत राजू तुळशीराम केथवास (वय. ४५), योगेश लक्ष्मीनारायण मालविया (वय. ४३), रोशन राजकुमार मेहरा (वय. ५२), अजय मनोहर मेंढारे (वय. ५५), संदीप सयाजी भंगाळे (वय. ४०), राजू उर्फ राजेंद्र पाव्हणू वाघ (वय. ५२) आणि मिलिंद निवृत्ती शिंदे (वय. ५३, सर्व रा. शिवाजी नगर) यांना अटक करण्यात आली.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now