Bhadgaon : बियर शॉपीवर अनधिकृत दारू विक्री; पोलिसांच्या धाडीत हजारो रुपयांची अनधिकृत दारू जप्त

जुलै 30, 2025 12:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२५ । भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथील बियर शॉपीवर अनाधिकृत देशी-विदेशी दारूची सर्रास विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यांनतर पोलिसांनी धाड टाकून २८ हजारांची अनधिकृत दारू जप्त केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

daru dhad

याबाबत असे की, पळासखेडे येथील महिंदळे रस्त्यावर असलेल्या सूर्यमित्रा बियर शॉपीमध्ये अनाधिकृत देशी-विदेशी दारूची सर्रास विक्री होत असल्याची गुप्त माहिती भडगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे काल रात्री भडगाव पोलिसांनी या बियर शॉपीवर धाड टाकली.

Advertisements

या कारवाईत पोलिसांनी २८ हजार रुपये किमतीचा अनधिकृत देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. संदीप जगदीश पवार (वय २२, रा. रुपनगर, पो. पळासखेडा, ता. भडगाव) हा व्यक्ती विक्रीच्या उद्देशाने विनापरवाना दारू बाळगताना आढळून आला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कडू परदेशी यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now