जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२५ । भुसावळ विभागामधून धावणाऱ्या अनेक ट्रेनमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर अनधिकृत फेरीवाल्यांचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. त्यातच रेल्वे गाड्यांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहे. यातच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भुसावळ विभागात ऑपरेशन यात्री सुरक्षा राबवण्यात येते आहे. त्यानुसार आरपीएफच्या पथकाने शेगाव रेल्वे स्टेशनवर एका संशयित तरूणाला अटक केली. त्याच्याकडून ४७ हजार रुपयांचे तीन मोबाइल जप्त करण्यात आले.

गीतांजली एक्स्प्रेसच्या (नं.१२८६०) जनरल डब्यात संशयास्पद फिरणाऱ्या सूरज विनोद किंगगवाकर (वय. २६, रा. स्वावलंबी बीएड कॉलेज परिसर, धांतोली, जि. वर्धा) या तरुणाला आरपीएफच्या गुन्हे शोध आहे. पथक व जीआरपीच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले. पंचासमक्ष तपासणी केली असता त्याच्या पँटच्या खिशात तीन मोबाइल आढळले.

त्यात १६ हजार, २५ हजार व ६ हजार रुपयांच्या मोबाइलचा समावेश चौकशीत त्याने हे मोबाइल मागील महिन्यात मलकापूर व शेगाव स्थानकावरून चोरी केल्याचे सांगितले. त्यापैकी एक मोबाइल चोरीची तक्रार शेगाव पोलिसांकडे दाखल आहे. तसेच त्याने एक मोबाइल २५ जुलैला मलकापूर स्टेशनवर महाराष्ट्र एक्सप्रेस (११०३९) मध्ये झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून चोरला होता.






