एरंडोल | पोलिस स्टेशनच्या गुन्हे शाखेने अवैध वाळू वाहतुकीविरोधात ठोस कारवाई करत दोन डंपरसह सुमारे १० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई एरंडोल-जळगाव महामार्गावर बीएसएनएल कार्यालयाजवळ, तहसील कार्यालयाच्या बाजूला करण्यात आली.

याप्रकरणी राहुल पिंताबर अहिरे (वय ४२, व्यवसाय ग्राम महसूल अधिकारी, रा. पिंपळकोठे बु., ता. जळगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी किरण लक्ष्मण महाजन (क्य ४५, रा. हणमंतखेडे सीम, ता. एरंडोल) हा अवैधरित्या चोरीची गौण वाळू वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ८ ब्रास अवैध गौण वाळू (किंमत अंदाजे ३० हजार रुपये) तसेच वाळूने भरलेले दोन डंपर (क्रमांक एम एच३० ए व्ही १०४६ व एम एच २४ एम यु १९१३) जप्त केले असून या वाहनांची अंदाजे किंमत १० लाख रुपये आहे.








