जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । PMC Recruitment 2022 : तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) मध्ये विविध पदांसाठीच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण ४४८ रिक्त पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार PMC च्या अधिकृत वेबसाइट pmc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठीचे अर्ज आज २० जुलैपासून सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 असणार आहे. PMC Bharti 2022
पदसंख्या : ४४८
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
सहायक विधि अधिकारी (Assistant Law Officer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी लॉमध्ये डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच वर्षांचा किमान पाच अनुभव असणं आवश्यक आहे.
लिपिक टंकलेखक (Clerk Typist) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MSC, टायपिंग हिंदी आणि मराठी तसंच MSCIT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ब्रान्चमध्ये इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
कनिष्ठ अभियंता यांत्रिक (Junior Engineer Mechanical) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ब्रान्चमध्ये इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच वर्षांचा किमान तीन अनुभव असणं आवश्यक आहे.
कनिष्ठ अभियंता वाहतूक नियोजन (Junior Engineer Traffic Planning) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
सहायक अतिक्रमण निरीक्षक (Assistant Encroachment Inspector) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
वयाची अट : १० ऑगस्ट २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
भरती शुल्क :
खुला वर्ग- 1000/- रुपये
राखीव वर्ग- 800/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते १,३२,३००/- रुपये.
अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा