जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी एका जाहीर सभेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) आव्हान दिल्याच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं तरीही मला संपू शकत नाहीत जर मी तुमच्या मनात असेल तर, असं पंकजा मुंडे म्हणाल्य. आता त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांनीही आश्चर्य व्यक्त केलं.
‘पंतप्रधान मोदी सुद्धा माझा पराभव करू शकत नाही असं नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी पाहिलं असेल तर ते दुर्दैवी आहे, असं खडसे म्हणाले. ‘राज्यसभेत पंकजा मुंडे यांना स्थान मिळालं नाही मात्र विधानसभेमध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांना हरविण्यात आलं. ही खंत पंकजा मुंडे यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे जनतेच्या विकास कामासाठी जोपर्यंत माझे योगदान राहील तोपर्यंत माझा कुणीही पराभव करू शकत नाही’ अशी भावना पंकजा मुंडे यांच्या मनात होती. व त्यातून त्यांनी हे वक्तव्य केलं असावं’ असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं.
तर पंकजा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे
पंकजा मुंडे पक्षावर नाराज असणं हे स्वाभाविक आहे. पंकजा मुंडे यांना न्याय मिळायला पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून पंकजा मुंडे यांच्यावर सातत्याने अन्याय होत असून मधल्या काळात पंकजा मुंडे यांना बदनाम करण्याचा देखील प्रयत्न झाला. मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपाचे राज्य आणून देण्यामध्ये ज्यांचे योगदान राहिलं त्यांची जर उपेक्षा पक्षाच्या माध्यमातून होत असेल तर हे योग्य नसून पंकजा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे, असंही खडसे म्हणाले.