सावदा । जळगाव लाईव्ह न्यूज । दीपक श्रावगे । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सावदा नगरपालिकेतर्फे विविध प्रकारचे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील सोमेश्वर नगर कॉलनीमध्ये दि.१४ ऑगस्ट रोजी रविवारी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. यात सुमारे ७५० वृक्ष लावण्याचे निश्चित करीत या अभियानास सुरवात झाली.
यावेळी श्री स्वामीनारायण मंदिर संस्थानचे कोठारी परमपूज्य शास्त्री राजेंद्र प्रसाद दासजी आणि परमपूज्य शास्त्री धर्मप्रसाद दास जी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. नगरपालिकेचे बांधकाम अभियंता अविनाश गवळी, स्वच्छता निरीक्षक महेश चौधरी, जितेंद्र लोखंडे, अभियंता विनय खक्के, आकाश तायडे, रविंद्र लोखंडे पाणीपुरवठा वाहन चालक जितेंद्र लोखंडे, पत्रकार दीपक श्रावगे, कैलास लवंगडे, राजेश पाटील, लेखापाल विशाल पाटील, नगरपालिका कर्मचारी व सोमेश्वर नगरवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वृक्षांचे संगोपन किती महत्त्वाचे आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर किती मोठा परिणाम होतो याचे महत्त्व संजय महाजन यांनी विशद केले तर वृक्षाला आपण जगवावे तर वृक्ष आपल्याला जगवेल, ज्याप्रमाणे झाड लावणे महत्वाचे आहे तितकेच त्याचे संगोपनही महत्वाचे आहे असा संदेश यावेळी उपस्थित शास्त्रीजी यांनी सर्व जनतेला दिला. तसेच वृक्षांबद्दल आत्मियता ठेवून त्यांना वाढवावे जोपासावे असे यावेळी सांगितले.