⁠ 
शनिवार, जून 15, 2024

दिवाळीत जळगाव-पुणे दरम्यान नियमितसह जादा बसेसच्या फेऱ्यांचे नियोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२३ । येत्या काही दिवसांवर दिवाळी सारखा सण येऊन ठेपला असून याच दरम्यान, जळगाव एसटी विभागाने दिवाळीत पुणे-जळगाव या मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता नियमित गाड्यांसह जादा बसेसच्या फेऱ्यांचे नियोजन केले आहे.यात शिवशाही, साधी परिवर्तन, शयनआसनी गाड्यांचा समावेश आहे.

दीपोत्सवामध्ये दिवाळी सण तसेच भाऊबीज साजरा करण्यासाठी जळगाववरून पुण्याला तर पुण्यावरून जळगावला येणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. प्रवाशांच्या मागणीनुसार जळगाव एसटी विभागाने दिवाळीमध्ये प्रवाशांसाठी जळगाव ते पुणे व पुणे ते जळगाव असे नियमित फेऱ्यांसह जादा बसेसच्या फेऱ्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंगची देखील सुविधा एसटी विभागाने खुली करून दिली आहे.

ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा
दिवाळीत नियमित व जादा बसगाड्यांसाठी एम.एस.आर.टी.सी या रिझर्व्हेशन ॲप वरून तसेच रेडबस, पेटीएम, अभीबस या मोबाईल ॲपवरून ऑनलाईन आरक्षण उपलब्ध केले आहे.

अजून बस फेऱ्या वाढविल्या जातील
जळगाव एसटी विभागाने दिवाळी निमित्त जळगाव येथून पुण्याला जाण्यासाठी तर पुण्यावरून जळगावला येणाऱ्या बसेसची आरक्षण सुविधा केली आहे. या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्यावर एसटी विभागाकडून अजून बसफेऱ्या वाढविल्या जाणार आहे.