जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबध्दतेच्या कारवाईचे सत्र सुरूच असून अशातच जळगाव शहरातील एका गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे. आझाद बहादुर भाट (वय-४१) रा. रामदेवबाब मंदीराजवळ, सुप्रिम कॉलनी असे स्थानबध्द केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
आझाद बहादुर भाट यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे १४ गुन्हे दाखल आहे. असे असतांना देखील त्याच्यात कोणतीही सुधारणा होत नव्हती. या अनुषंगाने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा अहवाला जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्याकडे सादर केला होता.
त्यानुसार पोलीस अधिक्षकांन अहवालाचे अवलोकन करून प्रस्तावाला मंजूरी मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रस्तावाला मंजूरी देवून गुन्हेगार आझाद बहादुर भाट याला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे. अशी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.