---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

धक्कादायक ! डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात आढळले गावठी पिस्तुलसह चार जीवंत काडतूस

godavari hospital
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । दि.२२ मे २०२१ | जळगाव खुर्द येथील डॉ. उल्हास पाटील मेडीकल महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील न्यायाधीन बंदी रूमजवळील स्वच्छतागृहाच्या छतावर एक गावठी पिस्तुल व चार जीवंत काडतूस आढळून आले आहे. रूग्णालयात गावठी पिस्तुल मिळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

godavari hospital

जळगाव खुर्द येथे डॉ. उल्हास पाटील मेडीकल महाविद्यालय आणि रूग्णालय आहे. या रूग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर कारागृहातील न्यायाधीन बंदींसाठी उपचारासाठी खोली आहे. या खोलीच्या शेजारी असलेल्या स्वच्छतागृहाच्या छतावर कुणीतरी गावठी पिस्तुल व चार जिवंत काडतूस लपविल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आला.

---Advertisement---

सायंकाळी रुग्णालयातील कर्मचारी स्वच्छतागृहात गेला असता त्यांच्या प्रकार लक्षात आला. त्यांनी लागलीच याबाबत पोलिसांना कळविले.

नशिराबाद पोलीस ठाण्याचे बशीर शेख, राजेंद्र साळुंखे, प्रवीण ढाके, शिवा चौधरी यांनी रूग्णालयात जावून पिस्तुल व काडतूस ताब्यात घेतले व रूग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---