अरे बापरे.. कबुतर झाले ‘झॉम्बी’, धोकेदायक विषाणू ठरतोय कारण, अनेक व्हिडीओ व्हायरल
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२२ । मनुष्यामध्ये एखाद्या विषाणूचा शिरकाव झाला आणि ते विचित्र म्हणजेच झॉम्बीप्रमाणे वागू लागल्याचे अनेक चित्रपट आजवर येऊन गेले आहेत. काही व्हिडीओ गेम देखील झॉम्बी नावाने आहेत. नुकतेच सोशल मीडियात काही व्हिडीओ व्हायरल होत असून कबुतर झॉम्बीप्रमाणे वागत असल्याचे त्यात दिसून येत आहे. मुळात म्हणजे कबुतरांना Pigeon Paramyxovirus पॅरामिक्सोव्हायरस (PPMV) या रोगाची लागण झाली असून हा प्रकार ब्रिटनमध्ये सुरु असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर आले आहे.
मनुष्यात जसे वेगवेगळे विषाणू शिरकाव करतात तसेच काही विषाणू प्राण्यांना देखील लक्ष करीत असतात. ब्रिटनमध्ये कबूतरांना एका नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळत असून या विषाणूची लागण झाल्यावर कबूतर ‘झॉम्बी’ (Zombie) बनत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कबूतरांवर ब्रिटनमध्ये पॅरामिक्सोव्हायरस (PPMV – Pigeon Paramyxovirus) या रोगाचं संकट ओढवले आहे. या विषाणूची लागण झाल्यावर कबूतराचं मेंदूवर संतुलन राहत नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, पिजन पॅरामिक्सोव्हायरसला (Pigeon Paramyxovirus) PPMV किंवा न्यूकॅसल रोग (Newcastle Disease) म्हणजे पक्षांमध्ये पसरणारा संसर्गजन्य आजार असेही म्हणतात. या रोगाची लक्षणे कबूतराचं मानेवर नियंत्रण नसणे आणि उडण्याची शक्ती नसणे, तसेच पंख आणि पाय थरथर कापणे, ही आहेत. सध्या ब्रिटनमधील कबूतरांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळत आहे. यासह न्यू जर्सीमध्ये या विषाणूची लागण झाल्याने काही कबूतरांचा मृत्यू झाला आहे. सध्या या विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नाही. मेंदूवर नियंत्रण नसल्याने कबुतरांचे स्वतःवर नियंत्रण नसते परिणामी ते मान सांभाळू शकत नाही आणि उडण्याची क्षमता देखील गमावून बसतात.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार सध्या ब्रिटनमध्ये कबूतरांना पॅरामिक्सोव्हायरस (PPMV) या रोगाची लागण झाली आहे. यामुळे ब्रिटनमधील कबूतरांचा जीव धोक्यात आहे. हा एक न्यूरोलॉजिकल आजार असून या आजाराची लागण झालेल्या कबुतराला हालचाल करता किंवा उडता येत नाही. या आजाराची लागण झालेल्या कबूतरांना हिरव्या रंगाची विष्ठा होते. हा रोग कबुतरांवरील अतिशय घातक आजार आहे. हा आजार कबुतरांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो. यामुळे कबुतराची मान फिरते, तर हवेत उडता उडता जमिनीवर कबुतर कोसळल्याचंही पाहायला मिळत आहे. माणसाला या आजाराची लागण होऊ शकत नाही. हा पक्ष्यांमधील आजार आहे.
जाणून घ्या काय आहे पिजन पॅरामिक्सोव्हायरस?
पिजन पॅरामिक्सोव्हायरस हा एक मज्जासंस्थेचा आजार आहे.
हा पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने कबूतरांमध्ये पसरणारा आजार आहे.
या रोगाला PPMV किंवा न्यूकॅसल रोग असेही म्हणतात.
माणसाला या आजाराचा धोका नाही.
2011 साली ऑस्ट्रेलियामध्ये हा आजार आढळून आला होता.
हा आजार मज्जासंस्थेवर म्हणजेच मेंदूवर परिणाम करत असल्याने कबूतराचा शरीराचा तोल सांभाळणे कठीण होते.
कबूतराचं मानेवर आणि शरीरावर संतुलन राहत नाही, त्यामुळे कबूतरांना उडता येत नाही.
तसेच या आजाराची लागण झालेलं कबूतर मान फिरलेल्या अवस्थेत गोल-गोल चक्कर काढताना पाहायला मिळतं.
सध्या या आजारावर लस उपलब्ध नाही.