---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

जळगावात पिकअप वाहनाची पानटपरीला जोरदार धडक ; दोघे जखमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२५ । जळगावातून अपघाताची एक मोठी दुर्घटना समोर आलीय. ज्यात एका बुलेरो पिकअप वाहनाने पानटपरीला जोरदार धडक दिली असून यात टपरी चालक महिलेसह ग्राहक गंभीर जखमी झाले. दोघांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. ही घटना आज बुधवारी सकाळी १० च्या सुमारास घडली.

JL

या घटनेबाबत असे की, जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील आंबेडकर नगर भागात आज २६ फेब्रुवारी रोजी सकाळी बुलेरो पिकअप वाहनाने रस्त्यावरील पान टपरीला जोरदार धडक दिली. या पान टपरीवर उभे असलेल्या ग्राहक पुरुषाला व पानटपरी चालक महिलेला गंभीर दुखापत झाली. ही बुलेरो पिकअप वाहनाने पान टपरीला धडक दिल्यानंतर पुढे असलेल्या विद्युत रोहित्रच्या खांबाला जाऊन धडकली.

---Advertisement---

रस्त्याच्या कामावर वापरण्यात येणाऱ्या या बुलेरो पिकअप वानाने दोन जणांना जखमी केली असून यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. अपघात घडल्यानंतर गाडीवरील चालकाने पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment