जळगाव लाईव्ह न्यूज । मुक्ताईनगर ते मलकापूर राष्ट्रीय महामार्गावर पिकअप गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातात एकाच जागीच मृत्यू झाला. बानिया सबला बारेला (वय ४०) असं मयताचे नाव आहे. तर या अपघातात अन्य पाच जण जखमी झाले. पिकअप गाडीमुळे तूर विक्रीसाठी नेत होते. मात्र या अपघातात महामार्गावर तुरीचे पोते पडल्याने शेतकऱ्याचे देखील नुकसान झाले आहे.

या घटनेबाबत असे की, मध्यप्रदेशातील असलेल्या वाहनातून तूर घेऊन मालकापूरच्या दिशेने निघाली होती. यामध्ये मध्य प्रदेशातील रहिवासी असलेले काहीजण या गाडीमध्ये बसून जळगावला येण्यासाठी बसले होते. मात्र सदरची गाडी मुक्ताईनगर- मलकापूर महामार्गावरून येत असताना गाडीचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून गाडी पलटी झाली.
गाडीमध्ये भरलेल्या तुरीच्या पोत्यांवर गुड्या वरजू बारेला, प्रेमसिंग मेलदार बारेला, बानिया बारेला, दावीबाणी बारेला, रामसिंग सुभाष ऊर्फ सबला बारेला हे बसले होते. वाहनाचे टायर फुटल्याने गाडी पलटी होऊन बानिया सबला बारेला (वय ४०) याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाचजण जखमी झाले आहेत.
जखमींना रुग्णालयात केले दाखल
अपघातात गुम वरजू बारेला, प्रेमसिंग मिलदार बारेला, दावी बानिया बारेला, पुतण्या शिकास ठाकूर राव, महेश रामलाल बारेला यांना गंभीर दुखापत झाली. जखमींना लागलीच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी मृतांचा भाऊ रामसिंग सुभाष ऊर्फ सबला बारेला याने दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.