---Advertisement---
भुसावळ राजकारण

सलग दुसऱ्या वर्षी भाजप आमदाराच्या बॅनरवर खडसेंचे फोटो

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभेचे भाजप आमदार संजय सावकारे(Sanjay Savkare) हे खडसे समर्थक असल्याचे सर्वांना परिचित आहे. सावकारे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्सवरून सलग दुसऱ्या वर्षी भाजपचे नेते गायब झाले असून बॅनरवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांचा फोटो आहे. कार्यकर्त्यांनी बनवलेले शुभेच्छांचे बॅनर, फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. जळगावातील राजकीय वर्तुळात मात्र बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे.

eknath khadse sanjay savkare

आ.संजय सावकारे यांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर केवळ भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांचा फोटो असून इतर नेत्यांना जागाच नसल्याचे दिसून येत आहे.

---Advertisement---

आ.संजय सावकारे एकनाथराव खडसेंचे निकटवर्तीय मानले जातात. आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कार्यकर्त्यांकडून देण्यात येणाऱ्या शुभेच्छांच्या बॅनरवर आता भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब झाल्याने खडसेंच्या पाठोपाठ सावकारे ही राष्ट्रवादीच्या (NCP) वाटेवर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

समर्थकांनी लावले बॅनर, जिल्ह्यात चर्चा

गेल्या वर्षीही भाजप नेते गायब
भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी दिलेल्या शुभेच्छांच्या बॅनरवर भाजपच्या बड्या नेत्यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. भाजपचे जळगावातील बडे नेते संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा देखील फोटो बॅनरवर लावण्यात आला नव्हता. त्यावेळी देखील संजय सावकारे (Sanjay Savkare) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एकनाथराव खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ संजय सावकारे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा होत्या. मात्र, संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देताना इतर भाजप नेत्यांचे फोटो छापले नव्हते. मात्र, संजय सावकारे यांनी त्यावेळी देखील पक्षांतरच्या चर्चा नाकरल्या होत्या.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---